नवी दिल्ली, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील पुरपरिस्थितीबाबत चर्चा केली.
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतजमिनी, पिके, रस्ते, घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली.या पार्श्वभूमीवर एनडीआरएफमार्फत तातडीची केंद्रीय मदत देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.यावर प्रतिसाद देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार ठामपणे उभे राहील, तसेच शेतकऱ्यांना आणि पुरग्रस्तांना पूर्ण सहकार्य व मदत मिळेल, असे आश्वासन दिले.

Post a Comment
0 Comments