Type Here to Get Search Results !

मानधन मिळण्यासाठी ई-पिक पाहणी सहाय्यकांचे तहसीलदारांना निवेदन


मेहकर, लोकतंत्र न्यूज 

महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्प ई-पिक पाहणीची सुरूवात केली असून शेतकरी स्तरावर शेतातील पिकांची ई-पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे 7/12 वर नोंद केली जाते.ही प्रकिया शेतकऱ्यांनी करायची आहे.परंतू ज्या शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता येते नाही व इतर कारणांमुळे शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणी झाली नाही.अशा शेताची ई-पिक पाहणी करण्यासाठी ई-पिक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली.रब्बी हंगाम 2024 मध्ये मेहकर तालुक्यातील ई-पिक पाहणी सहाय्यकांनी शेतात जाऊन ई-पिक पाहणी केली.मात्र अद्याप मानधन मिळाले नाही.तरी 8 दिवसात मानधन देण्यात यावे अन्यथा येणाऱ्या खरीब हंगाम 2025 मधील ई-पिक पाहणी करण्यात येणार नाही असे निवेदन ई-पिक पाहणी सहाय्यकांनी मेहकर तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

यावेळी मदन खरात, विष्णु आखरे, श्रीकृष्ण तांगडे,शंकर देशमुख,राजकिरण उतपुरे,किशोर निकम, संतोष मगर सह आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments