लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
लोणार तालुक्यातील तांबोळा येथे जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था,इथे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव इमारतीची पडझड आणि शिक्षकाची कमतरता यासारख्या समस्या भेडसावत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. यासारख्या समस्यामुळे विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी शिक्षण घेणे भाग पडत आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्याचबरोबर स्वच्छतागृहे बांधलेली असली तरी ती पाणी नसल्यामुळे फक्त नावालाच आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अवस्था ही गंभीर आहे भिंतींना तढे गेले आहेत पत्रे केव्हाही कोसळण्याचा धोका असल्यामुळे विद्यार्थी असुरक्षित वातावरणात शिक्षण घेत आहेत.
तीन खोल्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय असल्याने एक ते पाच वर्ग असतानाही केवळ दोनच खुल्या असल्या मुळे पाच वर्गांना दोनच खोल्यांमध्ये बसविल्या जात आहे.सोबतच विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची संख्या अवलंबून असल्यामुळे एक ते पाच पर्यंत वर्ग असतानाही केवळ तीनच शिक्षकांना पाच वर्गांना शिकावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही.
या सर्व कारणांमुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना भौतिक सुविधा पासून वंचित असल्यामुळे शाळेची दयनीय व्यवस्था झाली आहे. शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीकडे अनेक वेळा दुरुस्तीची मागणी करूनही सुविधा देण्यास दिरंगाई करण्यात येत आहे संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी डावण्याचा प्रयत्न करीत एकीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना सुख सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहेत असे सांगत असताना तसेच शाळा डिजिटल व स्मार्ट होत असताना दुसरीकडे अशी वाईट अवस्था दिसून येत आहे,ही मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही,पावसामध्ये गळणारे किचन शेडचे व्यवस्था,शौचालयाची दुरावस्था,नादुरुस्त व अपुरा विद्युत पुरवठा, कमी उंचीची असलेले शाळेला कंपाउंड अशा भौतिक सुविधा पासून विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे.
शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असताना केवळ भौतिक सुविधा नसल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठवत असल्याचे चित्र आहे. शाळेच्या ग्राउंड मध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने शाळा सुटल्यानंतर मध्यपिनचाही वावर असल्याचे दिसून येत आहे प्रशासनाने आकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी शाळेचे पाहणी करण्यासाठी मागणी विद्यार्थी व पालक यांनी केलेली आहे.
वरील सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत व पंचायत समितीने शाळेच्या भौतिक सुविधांसाठी व दुरुस्तीच्या मागणी करणे होत असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी शाळा समिती व गावकऱ्यांनी पंचायत समितीला निवेदन दिली आहे.
या निवेदनावर शाळा समिती अध्यक्ष संतोष खादंरकर,तांटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण आटोळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल मोरे, माजी सरपंच मधुकर राठोड,जनार्दन राठोड,प्रकाश आटोळे,उद्धव आटोळे यांच्यासह शाळा समिती सदस्य करीम चौधरी,गणेश राऊत,दिपक आटोळे,गणेश बोरुडे,उमेश राठोड याच्यासाठी तरी ग्रामस्थांनी सही केलेले निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.

Post a Comment
0 Comments