जळगाव, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हयातील अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या नामांकित संघटनेमार्फत आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय केडर कॅम्पचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संबोधित करत असताना पत्रकारांसाठी उभी केली गेलेली चळवळ म्हणजे 'व्हॉइस ऑफ मीडिया’ टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. यावेळी अनेक पत्रकारांशी संवाद साधला तसेच त्यांनी सुरु केलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे संस्थापक संदिप काळे, दिव्या भोसले यांच्यासह राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments