Type Here to Get Search Results !

डोणगाव ग्रामपंचायत सचिवांच्या भष्ट्राचाराची ग्राम विकास मंत्री यांच्याकडे तक्रार


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायत सचिव श्री. दांडगे यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत असून याबाबत ग्रामस्थांनी शासन दरबारी तक्रारींचा पाऊस पाडला आहे.अर्जदार अमोल वसंतराव धोटे (रा. डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांनी ग्रामविकास मंत्रालय, मुख्य सचिव, सचिव कार्यालय तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सविस्तर तक्रारी सादर करून ग्रामपंचायत निधीतील मोठ्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे की,ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातील व इतर आर्थिक बाबींमध्ये बेकायदेशीर खर्च व अनियमितता करण्यात आली आहे.पायाभूत विकासकामांमध्ये गंभीर भ्रष्टाचार होऊन गावकऱ्यांच्या हक्काचा निधी वाया गेला आहे.सचिव श्री. दांडगे यांनी नियमबाह्य पद्धतीने कामे करून स्वतःच्या फायद्यासाठी गैरव्यवहार केल्याचा ठोस आरोप आहे.या गंभीर आरोपांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून “ग्रामपंचायतीचा निधी लुटणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवले जाणार नाही” असा आक्रोश ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.


अमोल धोटे यांनी सादर केलेल्या अर्जातील प्रमुख मागण्या :

१) प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.२) चौकशी पूर्ण होईपर्यंत सचिव दांडगे यांना तात्काळ निलंबित करावे.३) दोषी आढळल्यास प्रशासकीय व कायदेशीर कठोर कारवाई करावी.

गावाच्या विकासासाठी असलेला निधी भ्रष्टाचाराला बळी पडल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. “डोणगावच्या जनतेच्या न्यायासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ” असा ठाम निर्धार अर्जदार अमोल धोटे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments