Type Here to Get Search Results !

फळबागांच्या झालेल्या नुकसानीस भरपाई द्यावी - काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी


बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने यावर्षी घेतल्या जाणाऱ्या संत्रा, जांब, सिताफळ, मोसंबी ,केळी,पंपई व लिंबू अशा फळबागांचे अतोनात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची पाहणी देखील यंत्रणेमार्फत अद्याप पर्यंत झालेली नाही .ही पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी.

अति पावसामुळे लागवड केलेल्या फळबागांची म्हणजेच संत्र्याच्या झाडांना मुळापासून सड लागलेली (फाइटोफ्थोरा) असून कोळशी या रोगाची फार शक्यता बळावलेली आहे. तर जांबाला व सिताफळाला सड व कीड लागल्यामुळे त्या झाडांच्या ही भविष्याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे.

परिसरातील शेतमजुरी करणाऱ्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेच्या माध्यमातून कास्तकारांनी ही फळबाग लागवड केलेली आहे.या अनुषंगाने सर्व कास्तकारांना आर्थिक मदत देऊन पुनश्च भाऊसाहेब फुंडकर योजनेच्या माध्यमातून नुकसान झालेल्या फळबागा करिता अर्ज करण्याची मुभा द्यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना केली आहे.

Post a Comment

0 Comments