Type Here to Get Search Results !

ओबीसी बांधवांच्या वतीने एल्गार मोर्चा


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

लोणार येथे ओबीसी समाजाच्या हक्क अधिकार आणि न्यायासाठी एक विशाल महा एल्गार मोर्चा मोठ्या उत्साहात संपन्न झाला समाजातील प्रत्येक घटकांनी एकजुटीने आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केला. हा मोर्चा ओबीसींच्या भविष्यातील दिशा ठरवणारा होता. हा मोर्चा लोणार शहरातील खटकेश्वर महाराज संस्थान ते तहसील कार्यालय लोणार येथे पाई शांततेने पार पडला.

यावेळी मुख्य मागण्या राजकीय दबावाखाली मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर रद्द करावा.हैदराबाद गॅजेट्स चा अशा पद्धतीने वापर करणे हा ओबीसींवर अन्याय आहे त्यामुळे तो रद्द करावा.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आणि घटनात्मक चौकटीचे येथे उल्लंघन करू नये ओबीसींचे आरक्षण हिसकाऊ नये.मराठा समाजाची प्रस्थापित राजकीय आणि सामाजिक स्थिती याचा विचार करता हा ओबीसींवर अन्याय आहे त्यामुळे हा जीआर रद्द करावा.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे संपूर्ण उच्चाटन या जीआर मुळे होईल त्यामुळे हे कोणालाच मान्य नाही .हा जीआर जात प्रमाणपत्र कायद्याची प्रक्रिया खिळखिळी करणार आहे.या व अशा इतर अनेक मागण्या यावेळी तहसीलदार लोणार यांना निवेदनात देण्यात आल्या तसेच मोठ्या संख्येने सर्व ओबीसी बांधव एकत्र येऊन शांततेच्या मार्गा ने हा मोर्चा पार पडला.यावेळी सर्व उपस्थित मान्यवर कार्यकर्ते आणि समाज बांधवांचे मोठ्या संख्येने योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments