मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक येथील लताबाई दिगंबर चव्हाण यांचे पतीचे नावे दिगंबर चव्हाण यांचे पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या यादीमध्ये MH 124390942 नुसार घरकुल मंजूर होते. परंतु विद्यमान सरपंच यांनी प्रस्ताव पाठवण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी केली होती परंतु त्यांचे आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांनी पैसे देण्यासाठी नकार दिला त्यांच्यामुळे सरपंच व सचिव यांनी पतीच्या नावे असलेले पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचा लाभ यापूर्वी घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून त्यांना अपात्र केले असा आरोपही त्यांनी केला आहे याबाबत दिनांक 1.8.2025. गट विकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांना देखे पत्र जाणून मधून देण्यात असही त्यांचे म्हणणे आहे. 19 सप्टेंबर रोजी पंचायत समिती मेहकर येथे जाऊन गट विकास अधिकारी यांच्याशी भेटले असता यांनी पंतप्रधान आवास घरकुल योजनेची माहिती विचारले असता त्यांनी सांगितले की सरपंच व सचिव यांनी पत्र दिले आहे. त्यामुळे त्यांना लाभ देता येणार नाही तसे पहिले तर सरपंच यांनी तीन घरकुलाचा लाभ घेतलेला आहे .उपसरपंच यांनी सुद्धा वडीलाच्या नावाने स्वतःच्या नावाने घरकुलाचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनाही अपात्र करण्यात यावे अशी मागणी सुद्धा लताबाई दिगंबर चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे त्यांनी दिनांक 20 सप्टेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर हे मुदत आमरण उपोषणाला ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसून सुरुवात केली आहे.

Post a Comment
0 Comments