मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे गेल्या अनेक दशकापासून होळकर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून नवरात्रात देवीची स्थापना करून अतिशय भक्तिमय वातावरणात पूजा अर्च आराधना केली जाते. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांच्या हस्ते सपत्नीक नवदुर्गाची महापुजा वआरती करण्यात आली .यावेळी होळकर नवदुर्गा मंडळाच्या वतीने बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी, जिल्हा परिषद माजी सभापती सायलीताई सावजी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शेलगाव देशमुख येथील संकट मोचन ग्रुप व ज्येष्ठ गावकऱ्यांच्या वतीने विठ्ठल रुखमाई मंदिराजवळ असणारी अनेक वर्षांपूर्वी गावाची तृष्णा भागवत होती त्या दरबारच्या विहिर काडी कचऱ्याने मोडकळीस आली होती या विहिरीची साफसफाई स्वच्छता केली. या समूहाने केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असून या कार्याची दखल घेत काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी सदर सामाजिक कार्य केलेल्या सर्व संकटमोचन ग्रुपच्या सदस्य व ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. याचबरोबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारीता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल विष्णु आखरे पाटील व पत्रकार गजानन नरवाडे यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित यांना मार्गदर्शन करताना माणूस हा सामाजिक कार्यातून मोठा होतो सामाजिक कार्य करणे एक ईश्वरी कार्य आहे सामाजिक कार्यात प्रत्येकाने अग्रेसर राहावं असं प्रतिपादन शैलेश सावजी यांनी केले. यावेळी उपसरपंच विनोद गोरे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश देशमुख, भिकाजी हरमकर,माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद गोरे, भगवान वाळले, विकास गोरे,रवि कष्टे, नारायण खोडवे, विलास काळदाते, प्रशांत कष्टे,गजानन खोडवे सह होळकर दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी, संकट मोचन मित्र परिवाराचे सत्कारमूर्ती, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments