Type Here to Get Search Results !

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त काँग्रेस शहराध्यक्ष शेख समद यांच्याकडून बुंदी व शित जल वाटप

 

लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 


प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लोणार शहरात ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मुस्लिम बांधव, युवक, प्रतिष्ठित नागरिक तसेच चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक मिरवणुकीत सहभाग घेतला.शहराच्या मुख्य चौकातून निघालेल्या या मिरवणुकीत युवकांनी घोषणाबाजी करत, हातात झेंडे फडकवत व ढोल-ताशांच्या गजरात वातावरण उत्साहमय केले. मुस्लिम समाजातील नागरिकांसह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, पत्रकार संघटनेचे सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या मिरवणुकीत सहभागी झाले.या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी सामाजिक बांधिलकी जपत मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना व युवकांना बुंदीचे वाटप करून आदर व्यक्त केला. त्यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.मिरवणुकीदरम्यान धार चौक येथे मुस्लिम बांधवांचे भव्य स्वागत करण्यात आले. गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देत ऐक्य, प्रेम व सद्भावनेचा संदेश देण्यात आला.शहरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले. हजारो युवक व लहान मुलेही जोशात सामील झाल्याने लोणार शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव आनंद, उत्साह आणि सामूहिक ऐक्याचे प्रतिक ठरला.


यावेळी या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ धुमाळ, माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, माजी उपनगराध्यक्ष बादशाह खान, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे, तालुकाध्यक्ष अश्रू जी फुके, प्रदीप शेठ संचेती, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, माजी नगरसेवक नितीन शिंदे, माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब, माजी नगरसेवक संतोष मापारी, माजी नगरसेवक शेख राहुफ भाई, रमजान परसु वाले, माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन कांबळे,माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, माजी नगरसेवक अरुण जावळे, माजी नगरसेवक सतीश राठोड, भरत राठोड,शहर अध्यक्ष युवक विकास मोरे, माजी नगरसेवक अब्दुल उबेद हाजी मुनाफ, माजी नगरसेवक शेख अस्लम शेख कासम, एजाज खान, रहमान नारंगाबादी, शेख रहमत शेख अनामत, गजानन जाधव, शाम राऊत,वसंता जावळे, दिनकर जाधव, एकबाल भाई,मुमताज भाई, तहसीन भाई, करामत भाई, मुक्तार भाई, शेख अब्दुल शेख इब्राहिम, मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments