Type Here to Get Search Results !

मदन वामन पातुरकर विद्यालयातील गणरायाला भावपूर्ण निरोप


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

 


शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 6 सप्टेंबर रोजी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गश:विविध अप्रतिम समाज जनजागृती पर देखावे सादर केले.यावेळी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याकरिता विद्यालयाचे पालक संचालक गोपाल बोरा, सल्लागार सुनील बियाणी, बबन गोरे व रामेश्वर मोरे, माजी शिक्षक पिंपरकर यांच्यासह सल्लागार व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते .यावेळी मदन वामन पातुरकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डोणगाव नगरीतून प्रभात फेरी मार्गाने जात असताना विविध अप्रतिम देखावे सादर केली. त्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा. तुळस लावा अंगणी, महाराष्ट्र ही संताची भूमी असून त्यानिमित्ताने दिंडी सोहळा दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी टाळ मृदंगाच्या निनादात भरपूर आनंद लुटला.याचबरोबर गड किल्ल्यांचे संवर्धन ,मराठीला राज्यभाषा दर्जा मिळाल्याने त्याचे सादरीकरण, लेझीम पथक ,पर्यावरण जनजागृती,थोर महापुरुषांच्या वेशभूषा,छत्रपती शिवरायांची मावळे असे विविध समाजप्रबोधनपर, धार्मिक ,सांस्कृतिक असे मनमोहक देखावे विद्यार्थ्यांनी सादर करून पाहणाऱ्या प्रेक्षकांचे डोळ्यांचे नेत्र दीपक पारणे फेडले . ही विसर्जन मिरवणूक प्रभात फेरी मार्ग काढण्यात आली.दरम्यान डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकी दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता .गणेश विसर्जन मिरवणूकीकरता विद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी विद्यालयामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments