मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने (ता. ५सप्टेंबर) मोठ्या उत्साहात व जल्लोषात मरकझी (मुख्य) जुलुसे ईद-ए-मिलादुन्नबीचे आयोजन करण्यात आले होते.
मुस्लिम बांधवातर्फे शहरातील इमामबाडा चौक , गवळीपुरा चौक, मदीना चौक, माळी पेठ, छोटा इमामबाडा चौक अशा विविध परिसरातून ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त भव्य मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. आणि जामा मज्जिद येथे विश्व शांतीसाठी प्रार्थना करून शेवट करण्यात आला.
(जुलूस) च्या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी, तरुण युवक व अबाल-वृद्धांनी धार्मिक ध्वज पताका घेत जशने ईद मिलादुन्नबी जिंदाबाद, नारा ए तकबीर अल्लाहू अकबर अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सदर मिरवणूक गवळी पुरा मदीना चौक येथे आली असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात,प्रा आशिष रहाटे,किशोर गारोळे यांच्या हस्ते मिठाई व पाणी वाटप करण्यात आले या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रा आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, युवा सेना तालुका अध्यक्ष ॲड आकाश घोडे, ॲड संदीप गवई, रमजान चौधरी, बाबू गवळी, अकबर गवळी, लल्ला गवळी, इमाम गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हा प्रमुख निसार अन्सारी, रफिक शेख,अन्सार शेख, यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments