रोडवर अडकलेल्या ट्रक मुळे वाहतूक बंद, वाहतूक सुरळीत करण्याची मागणी
September 02, 2025
0
मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात मेहकर सायाळा रोडवर गेल्या दोन दिवसापासून एक मोठा ट्रक रोडवर आडवा झाला असून नादुरुस्त अवस्थेत उभा आहे या ट्रकमुळे सायाळा, बदनापूर सह इतर गावात जाण्यासाठी मार्ग बंद झाला असून शेतकऱ्यांना शेतात व तसेच नागरिकांना मेहकर येथे व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे सदरचा ट्रक तात्काळ रस्त्यावरून हटवण्यात यावा अशी मागणी 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता लक्ष्मण तांगडे,प्रमोद आसोले सह नागरिकांनी केली आहे.
Tags

Post a Comment
0 Comments