मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शेख रसूल शेख अब्बास यांची पवित्र हज यात्रे करता निवड झाली आहे.शेलगाव देशमुख येथे वसंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी पवित्र हज यात्रेसाठी निवड झाल्याबद्दल शेख रसुल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संपतराव देशमुख, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वसंतराव देशमुख,सरपंच दिलीप आखरे, ग्रामपंचायत सदस्य मदन काळदाते खंडारे ,भिकाजी हरमकर, सामाजिक कार्यकर्ते तोफिक भाई, धनंजय देशमुख , तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष प्रल्हाद गोरे,पोलीस पाटील संतोष सोनूने आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments