Type Here to Get Search Results !

महालक्ष्मीच्या मखर मध्ये अति विषारी मण्यार सापाला सर्पमित्रांनी केले रेस्क्यू


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 


लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथे 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता च्या दरम्यान अश्विन सानप यांच्या गौरी गणपतीच्या मखर मध्ये साप आढळून आला साप दिसताच मी लोणारकर टीमचे सदस्य सर्पमित्र सचिन कापुरे व सर्पमित्र कमलेश आगरकर, सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना माहिती दिली असता सर्पमित्र सचिन कापुरे व कमलेश आगरकर,विनय कुलकर्णी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व अश्विन सानप यांच्या घरातील महालक्ष्मीच्या मखर मध्ये बसलेल्या अतिविषारी मन्यार प्रजातीच्या सापाला पकडून भरणी बंद केले सापाला पकडून सापाबद्दलची भीती दूर केल्याबद्दल अश्विन सानप सह परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र सचिन कापुरे, कमलेश आगरकर व विनय कुलकर्णी यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments