चिखली, लोकतंत्र न्यूज
चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक शाळा येथे २४ सप्टेंबर रोजी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट शाखा मेहकर जिल्हा बुलढाणा यांचे वतीने गजानन इंगळे संस्थापक अध्यक्ष मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर दत्तात्रय वाघमारे विदर्भ सहसचिव, समाधान पदमणे- महाराष्ट्र मीडिया प्रभारी, गोपाल सोनटक्के चिखली तालुका अध्यक्ष, रमेश कणखर विदर्भ संघटक, सत्यनारायण वाघ सदस्य, गोविंद महाजन सदस्य, गजानन निळे सदस्य आणि जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक शाळा येथील शिक्षक आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राचार्य तसेच सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये सर्व मान्यवरांचे तसेच शिक्षक वृंदांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि शिक्षक वृंदांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांची पाहणी केली असता त्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे कलागुणांचे कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये मानव सेवा ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे आणि प्रमुख मान्यवरांनी तसेच शिक्षक वृंद यांनी वृक्षारोपण बाबत तसेच विद्यार्थी जीवनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गजानन इंगळे, समाधान पदमणे, गोपाल सोनटक्के, दत्तात्रय वाघमारे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्या मुलांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून त्यांचा गुण गौरवासाठी त्यांना प्रशस्तपत्र, वैशालीय गणवेश, शालेय साहित्य प्रोत्साहन पर देण्यात येणार असे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले शाळेलाही योगदान देण्यात येईल. आणि गोपाल सोनटक्के यांची चिखली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट चे सर्वेसर्वा अध्यक्ष गजाननजी इंगळे यांचे हस्ते नियुक्तीपत्र व गोल्ड मेडल प्रशस्तीपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी प्राचार्य गाडेकर सर, सर्वोदय सर, केदार सर, घुगे सर, आणि सर्व शिक्षक शिक्षिका अशा प्रकारे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.


Post a Comment
0 Comments