मुंबई, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली परंतु त्यामध्ये मोठा घोळ दिसून येत आहे. सन 2024 चा पिक विमा आधीच उशिरा देण्यात येत आहे आणि त्यातही अनेक शेतकऱ्यांना 19 रु, 24 रु,74 रु,90 रु आणि 100 रुपये अशी अगदी अत्यल्प आणि तुटपुंजी रक्कम मिळाली आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान असून भारतीय कृषी पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.
शेतकऱ्यांचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई येथे मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी व कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Post a Comment
0 Comments