बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड शिवश्री मनोज आखरे यांचा वाढदिवस संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा करण्यात येतो.याचे कारण म्हणजे मनोज आखरे यांचा कार्यकर्त्यांप्रती असलेला आदरभाव.
मनोज आखरे हे पक्षप्रमुख असून साध्यात साध्या कार्यकर्त्याची ते आवर्जून दखल घेतात.मनोज आखरे यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रासह इतर राज्यातही नावारूपाला आले व युवकांचे एक मजबूत संघटन निर्माण झाले.एवढ्या कर्तृत्ववान व्यक्तीने साधारण कार्यकर्त्याची सुद्धा नावानिशी ओळख ठेऊन त्याचा आदर करणे ही मोठी बाब आहे.यामुळे त्यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड नक्कीच राजकीय सत्ता हस्तगत करेल जे की मराठा सेवा संघ सह संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ॲड. इंजी.शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचे स्वप्न आहे व हे स्वप्न मनोज आखरे नक्कीच लवकरच सत्यात उतरवतील असा ठाम विश्वास पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे.याच अनुषंगाने ३ सप्टेंबर रोजी संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा(उत्तर) जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी तळागाळातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्या कार्याचा गौरव केला.या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा शिवमती कोमलताई सचिन तायडे ह्या प्रमुख उपस्थिती म्हणून लाभल्या. विशेष कामगिरी करून जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड वाढीसाठी मोठे योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.यात विशेष सत्कार म्हणून संभाजी ब्रिगेड जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे ,जिल्हा सचिव मंगेश सोळंके,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे,जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर,नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे,मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल संबारे यांच्या कार्याचा गौरव करत शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन विशेष सत्कार केला.यामुळे नक्कीच त्यांच्या कार्याला वाव देऊन गौरविल्यामुळे त्यांच्यात ब्रिगेड वाढीसाठी आणखी नवीन उस्ताह निर्माण झाला असून ते अजून जोमाने काम करून पक्षाला क्रमांक एक वर आणण्यासाठी प्रयत्न करू असे विशेष सत्काराला उत्तर देत सर्वांनी विश्वास व्यक्त केला.सोबतच इतर उपस्थित विद्यार्थी आघाडी जिलाध्यक्ष पवन सोळंके,संभाजी ब्रिगेड निमगाव जिल्हा परिषद सर्कल प्रमुख वैभव पारस्कार,तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगात, ऑटो युनियन तालुकाध्यक्ष विलास वक्टे,पुरुषोत्तम साबे,पत्रकार अमीन खान,अभिषेक सोळंके,श्रीकांत वेरुळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments