Type Here to Get Search Results !

सहकार विद्या मंदिर डोणगावचा आट्यापाट्या संघ जिल्ह्यातून दुसरा


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित. डोणगाव येथील इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर डोणगाव च्या मुलींच्या चमूने आट्यापाट्या खेळ प्रकारात जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावला.

         महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेल्या,शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखत. दिनांक 24 सप्टेंबर रोजी. शेगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहकार च्या मुलींच्या संघाने जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये मानवी देशमुख, चैताली पळसकर, आदिती वानखेडे, अनुश्री खंडारे, प्रणाली पळसकर, श्रावणी साबळे, अनुष्का सुर्वे, राधिका अंभोरे, कृष्णाली वानखेडे, तनुष्का बाजड, वैष्णवी झनक, प्राची गोळे या मुलींचा सहभाग होता.      


मैदानी स्पर्धांमध्ये तालुका स्तरावर 14 वर्षे वयोगटातील.मुलींच्या रिले स्पर्धेत प्रणाली पळसकर, चैताली पळसकर, श्रावणी साबळे, अनुश्री खंडारे, आदिती वानखेडे, यांच्या चमूने प्रथम क्रमांक मिळवला. वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत हेतल खवाल थाळीफेक मध्ये द्वितीय, चैताली पळसकर 100 मीटर मध्ये प्रथम, लांब उडी प्रथम. आदिती वानखेडे थाळीफेक मध्ये प्रथम. प्रणाली पळसकर. अडथळ्यांच्या शर्यतीत पहिली आली. 

      17 वर्षाखालील वयोगटात वेदिका जाधव अडथळ्याच्या शर्यतीत द्वितीय. साक्षी मोरे प्रथम. वेदिका नवले तीन किलोमीटर वाकिंग मध्ये प्रथम क्रमांक. स्वरांजली आंबेकर द्वितीय क्रमांक. 19 वर्षाखालील वयोगटात. अक्षरा भुसारे ट्रिपल जम्प मध्ये प्रथम. मुलांच्या 14 वर्षे खालील वयोगटात. अंशुमन गावंडे 100 मीटर द्वितीय. लांब उडी मध्ये द्वितीय. चंदन बाजड 200 मीटर मध्ये द्वितीय. श्रीपाद सुर्वे हर्डल मध्ये द्वितीय, 17 वर्षां खालील वयोगटात कार्तिक देशमुख पाच किलोमीटर वाकिंग मध्ये द्वितीय क्रमांक, सार्थक दांदडे तिसरा क्रमांक. आशिष राठोड 100 मीटर रनिंग द्वितीय. ट्रिपल जंप. द्वितीय क्रमांक, यानिमित्त, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल को-आँप क्रेडिट सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल को-आँप क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश झंवर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा, कोमल झंवर तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुनील गाढे, क्रीडा शिक्षक सातपुते, नारायण खोडके, विनय खोडके, उल्का सिरसाट. व शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments