Type Here to Get Search Results !

ओला दुष्काळ व कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक


लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालया बाहेर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेत्रुत्वात तालुका व जिल्हाभरातील हजारो शेतकरी ओला दुष्काळ,विना अटी-शर्ती सातबारा कोरा, हेक्टरी किमान पन्नास हजार रुपए मदत,प्रलंबीत पिकविमे,योजनांचे रखडलेले अनुदान व शेतकर्यांना सोलार प्लेटसाठी विलंब करनार्या कंपन्यांविरोधात आक्रमक होत भव्य शेतकरी संघर्ष आंदोलन पार पडले.यावेळी शेतकर्यांसहीत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांचे रौद्र रुप पहायला मिळाले.प्रशासन व सरकारच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व शेतकर्यांच्या वतीने महामार्ग अडवुन रास्ता रोको करन्याचा प्रयत्न करन्यात आला.शेतकरी आज मरनाच्या दारात असताना सरकार ने किमान पन्नास हजार रुपए हेक्टरी मदत करन्याचे सोडुन केवळ साडेआठ हजार रुपए व दोन हेक्टरची मर्यादा लावने म्हणजे शेतकर्यांची सरकार कडुन थट्टा करन्यात आली आहे अशा प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केल्या.तसेच आजपर्यंत रखडलेले विमे व येलो मोझॅकमुळे रिजेक्ट केलेले शेतकरी याविषयी यापुर्वी पालकमंत्र्यांसहीत जिल्हाप्रशासना मार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या विमा पावत्यांबद्दल जाब विचारन्यात आला.यावेळी तालुकाभरातील हजारो शेतकरी जमल्यामुळे काहीकाळ वाहतुक बंद झाली होती.सरकारला जाग आनन्यासाठी ढोलकी व ताशा सुद्धा वाजवन्यात आला. महीला शेतकर्यांनीही सहभागी होत यावेळी डोळ्यांतुन अश्रु वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान मुख्यमंत्र्यांना देन्यात येनारं निवेदन उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी साहेबांनी रस्त्यावर येवुन स्विकारलं.यावेळी जिल्हाकार्याध्यक्ष कैलास पाचपोर,जिल्हापदाधिकारी सुनिल वाघमारे, तालुकाध्यक्ष धनंजय बुरकुल,ता.सचिव कैलास पवार,उपाध्यक्ष रमेश बचाटे,उपाध्यक्ष गजानन पवार, उपाध्यक्ष रमेश माल, गजानन पवार, पंजाब पवार,प्रविण काळदाते,रवि वाघ,रमेश चनखोरे, संदीप नागरीक,दिलिप जाधव, अविनाश काळे, दत्तात्रेय गिर्हे, गजानन वाघ,लक्ष्मण धोटे,रमेश पाडोळे,शेख साबीर, दत्ता जागृत, प्रह्लाद तोंडे,प्रभाकर शेळके, रामराव वानखेडे, संदीप गरड, रवि गिरी, रवि वाघ ,विजय अवचार,पंढरी सरकटे आंदींसहीत तालुक्यालीत हजारो शेतकरी उपस्थित होते.यावेळी उपस्थित शेतकर्यांनी सरकार विरोधात प्रचंड रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली.यावेळी वयोवृद्ध व महीला शेतकर्यांची उल्लेखनिय उपस्थिती पहायला मिळाली.

Post a Comment

0 Comments