मलकापूर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
नांदुरा-मलकापूर तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. सोयाबीन पिक हे वेगवेगळ्या रोगाने घेरले असून हुमनीअळी व येलोमोझ्याक असे गंभीर रोग सोयाबीन या पिकावर आल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.नांदुरा-मलकापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा असे निवेदन २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटना,करणी सेना व युवा भिम सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी मलकापूर, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी स्वभामानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील, नांदुरा तालुका अध्यक्ष चरणसिंग राजपूत ,करणी सेनेचे मलकापूर शहर अध्यक्ष अमरदीपसिंह ठाकूर, युवा भीमसेनेचे वैभव वानखेडे, अक्षय राजपूत, मनोज राजपूत, संतोष खिरोडकर ,अमोल जाधव ,संदीप राजपूत, कोमलसिंग राजपूत, ज्ञानेश्वर सोनोने ,स्वप्निल राजपूत, नितीन राजपूत, पवन राजपूत, प्रमोद अटकर पाटील सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments