बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
कर्जाच्या ओझ्याने आणि अतिवृष्टीच्या तडाख्याने खचलेल्या नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी पुत्र मंगेश मारोती बोरसे यांनी गौरी आगमनाच्या दिवशी जीवन संपवलं. याला हे निर्दयी सरकारच जबाबदार आहे. अतिवृष्टीच्या महापुरात सर्वस्व गमावलेले शेतकरी महिन्याभरापासून भरपाईची वाट पाहत आहे, मात्र हे बेशरम सरकार शेतकऱ्यांच्या मृत्यूचा फक्त तमाशा बघत आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?हा आक्रोश ऐकण्यासाठी अजून किती शेतकऱ्यांना मरावं लागणार आहे?तातडीने भरपाई द्या नाहीतर संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरतील.असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता व्यक्त केले आहे.

Post a Comment
0 Comments