Type Here to Get Search Results !

मंजूर झालेले वीजरोहीत्र तात्काळ बसविण्यात यावे - शैलेश सावजी


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

 मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे गावाला विद्युत वितरण कंपनीच्या विजरोहित्र वरून वीज पुरवठा केला जातो मात्र येथील श्री विठ्ठल रुखमाई विद्यालया जवळील असणाऱ्या विद्युत वीजरोहित्रा वर सर्वाधिक वीज भार असल्याने सदर वीज रोहित्रा वरील वारंवार वीज खंडित होते. यामुळे सदर विद्युतवीज रोहित्राची दयनीय अवस्था झाली असून सर्वाधिक वीज भार असल्याने वारंवार फ्यूज उडणे,वीज पुरवठा खंडित होणे. यामुळे प्रभाग दोन मधील नागरिकांना मोठा विजेचा सामना करावा लागत असून सदर बाब काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी लक्षात घेऊन सदर वीज रोहितरावरील विद्युत भार कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 2021 मध्ये नवीन विद्युत पुरवठा करण्याकरिता नवीन विद्युत वीज रोहित्र मंजूर करण्यात आले होते. परंतु अद्यापही विद्युत रोहित्राचे काम केले नसून विद्युत वितरण कंपनीने डीपी टीसी मधील मंजूर रोहित्राचे काम तात्काळ सुरू करावे अशा आशयाचे निवेदन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी डोणगाव येथील विद्युत वितरण कंपनीचे अभियंता दिले आहे.

Post a Comment

0 Comments