Type Here to Get Search Results !

ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनवरी व डॉक्टर आपल्या घरी- डॉ गोपाल बछिरे


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

लोणार येथील ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनवरी आणि डॉक्टर आपल्या घरी, अशी अवस्था शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या पाहणीत समोर आली आहे.

लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात आठ ते दहा निवासी डॉक्टरांची नियुक्ती आहे. सध्या अनेक रुग्ण साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत व रुग्णालयात रुग्णांची रांग लागलेली आहे .शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे त्यांच्याकडे अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराविषयी तक्रारी घेऊन आले असता, डॉ. गोपाल बछिरे व पदाधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले तर रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या डॉक्टर, ऋतुजा चव्हाण (गवई) एकमेव डॉक्टर तेथे हजर होत्या व त्या रुग्णांना आजाराचे लक्षण विचारून औषधी लिहून देत होत्या रुग्णांची तपासणी करण्याकरिता कोणताही डॉक्टर उपलब्ध नव्हता या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर हे सुद्धा हजर नव्हते जेव्हा डॉ.गोपाल बछिरे यांनी वैद्यकीय अधिकारी गाडेकर यांना फोनवरून विचारणा केली असता ते अकोला येथे होते अशा बेजबाबदार व्यवहारामुळे कोणी रुग्ण दगावला तर जबाबदार कोण? येथेच दोन महिन्यापूर्वी एक रुग्ण बेडवर जळून खाक झाला तेव्हाही तेथे एकही डॉक्टर हजर नव्हता अशा बेजबाबदार डॉक्टरानवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी शिवसेना उबाठा जिल्हा संघटक हे जिल्हाधिकारी यांना भेटून तक्रार देणार असे कळले आहे, यावेळी डॉ गोपाल बछिरे सह शिवसेना शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, युवा शहरप्रमुख श्रीकांत मादनकर, विभागप्रमुख तानाजी अंभोरे, अल्पसंख्यांकचे अशपाक खान, फहीम खान, प्रकाश सानप, महिला संघटिका तारामती जायभाये, शहर संघटिका पार्वतीबाई सुटे, तालुका उपसंघटिका शालिनीताई मोरे, उपसरपंच रवी सुटे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, शेख रफीक, रवी मोरे, अमोल पसरटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments