सिंदखेडराजा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा शहरातील जिजाऊ राजवाडा समोर 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी अतिश तायडे, डॉ. प्रवीण तायडे, उमेश खरात सागर मेहेत्रे यांच्यासह ओबीसी बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी भेट दिली.यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments