मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
आंबेडकर चळवळ, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने. महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सवा निमित्ताने, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून, ठसा उमटविणाऱ्या मातंबराचा गुणगौरव सोहळा,मेहकर येथे संपन्न झाला. नागवंशी संगपाल पनाड, यांना पुरस्कार जाहीर होताच. सुलतानपूर ग्रामपंचायत प्रशासन, अख्तर भाई मित्र मंडळ, नागवंशी संघटन, भीम योद्धा ग्रुप, विविध सामाजिक संघटना संस्थेच्या वतीने व मित्र मंडळाच्या वतीने ठीक ठिकाणी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरून सत्कार करण्यात आला. या पुरस्कारामुळे मेहकर व लोणार मतदार संघामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागवंशी संघपाल पनाड हे, गेल्या दोन दशकापासून समाजसेवेला सर्वस्व मानून, शेतकरी, कष्टकरी, विधवा, निराधार ,अपंग, महिला, दिन- दलित, वंचित समूहाला न्याय देण्यासाठी. शेकडो उपोषणे, मोर्चे,आंदोलने करून त्यानी न्याय दिला आहे. ह्याच त्यांच्या आक्रमक कार्यपध्दतीची दखल घेऊन. आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नागवंशी संघपाल पनाड, यांनी चळवळीला सर्वस्व मानून , चळवळीच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला न्याय कसा देता येईल. यासाठी ते धडपडत असतात.
प्रतिक्रिया व्यक्त करताना, नागवंशी संघपाल पनाड यांनी सांगितले की, राज्यस्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा माझ्या खांद्याला खांदा लावून मला साथ देणाऱ्या सहकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, महिला, विधवा, अपंग, निराधार, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी लढत राहणे हेच माझे अंतिम ध्येय आहे.

Post a Comment
0 Comments