सिंदखेडराजा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा मतदारसंघातील मौजे सावखेड तेजन,पळसखेड चक्का आणि किनगांव राजा इत्यादी गांवामध्ये अतिवृष्टीमुळे प्रंचड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेत जमीनीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.केंदीय राज्प्रयमंत्री जाधव यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याप्रसंगी उपस्थित गावातील शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी,यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. यामध्ये शेतकरी बांधवाच्या कपाशी, सोयाबीन,तूर अन्य विविध पिंकाचे नुकसान झाले आहे. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहे.
यावेळी माजी आमदार डॉ.शंशिकांत खेडेकर,उपविभागीय अधिकारी संजय खडसे,तहसीलदार अजित दिवटे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव मोरे,सुदाम काकड,विधानसभा प्रमुख शिवप्रसाद ठाकरे,शिवसेना तालुका प्रमुख वैभव देशमुख,युवासेना ता.प्रमुख संदिप मगर,अमोल काकड,मोरेश्वर मिनासे,बबनराव शेळके यांच्यासह शिवसेना,युवासेना महायुतीचे पदाधिकारी,महसूल,कृषी,गटविकास अधिकारी अन्य विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी,शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments