बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यातील रायपुर गावाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर रबरचे गतिरोधक टाकणेसाठी.मो.फयाज मो.एजाज (अध्यक्ष एकता ग्रुप) यांचे नेतृत्वाखाली एकता ग्रुप रायपूरच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच रस्ता सुरक्षा समितीस निवेदन देण्यात आले.गतिरोधक न टाकल्यास केला उपोषणाचा इशारा.
रायपुर हे हातणी ते दुधा राष्ट्रीय महामार्गावरील वसलेले आहे. या रस्त्यावर सैलानी बाबा या तीर्थक्षेत्र असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची खूप रहदारी असते. तसेच या रस्त्यावर रायपुर गाव हद्दीत जिजाऊ इंग्लिश स्कूल, प्रथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, शिवाजी हायस्कूल, आठवाडी बाजार, खाजगी दवाखाने, प्रथमिक उर्दू शाळा पशुवैघकीय दवाखाना, कोचिंग क्लासेस, पेट्रोल पंप, व अनेक व्यवसायीक प्रतिष्ठाणे व इतर गाव जोड रस्ते आहेत. आणि विशेष दररोज संध्याकाळचे ४ वाजेपासून ते ८ वाजे पर्यंत भाजीपाला घेवून जाणरे (मंडीटच) भरधाव वेगाने धावणा-या पीकअप, आयशर वाहनांना रोखण्यासाठी काही उपाययोजना तत्काळ करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात या भरधाव वेगाने धावणारे वाहनांमुळे होणारे अपघात टाळता येत नाही. या पूर्वीही या वाहनांमुळे अपघात झालेले आहे व काही लोकांना जीवाला मुकावे लागले आहेत. व अनेक जणांना जायबंधी त्रस्त आहेत.
तरी सदर रस्त्यावर जोडलेले योग्य ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे. जेणे करून वाहनांच्या गतीवर अंकुश लावण्यास मदत होईल.व अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल.
करिता जिल्हाधिकारी तसेच रस्ता सुरक्षा समितीकडे बुलडाणा यांना एकता ग्रुपचे वतीने रबरचे गतिरोधक बसविण्यात यावे अशी मांगणी करण्यात आली या वेळी एकता ग्रुप चे अध्यक्ष मो.फयाज मो.एजाज, मुकीम शाह कलीम शाह, (उपाध्यक्ष एकता ग्रुप) शे.अजहर शेख.अफसर, (सचिव एकता ग्रुप) राजू नेता, शेख मजहर, इमरान खान, रेहान खान, शेख साहील, शहेजाद खान,सय्यद अनिस,शे.अयान, नसीम शाह, फारूक खान, आसिफ खान,शेख रिजवान, शेख जावेद व इतर हजर होते.

Post a Comment
0 Comments