Type Here to Get Search Results !

काँग्रेस पक्षाकडून मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी मॅरेथॉन संपन्न


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी लोणार शहर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष शेख समद शेखअहमद,तालुका अध्यक्ष अश्रू फुके यांनी आज मॅरेथॉन दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सात वाजता बस स्टॅन्ड समोरून आयोजित केली होती या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे यांनी हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली ही मॅरेथॉन हिरडव चौक, लोणी नाका, मंठा नाका, धार चौक, येते समाप्त झाली धार चॉक येथे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर, प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे, माजी उपाध्यक्ष शांतीलालजी गुगलीया, एडवोकेट अनंतराव वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी, माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, माझे सभापती ज्ञानेश्वर चिभडे, सेवा दलाचे प्रदेशचे शैलेश बाविस्कर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तौफिक कुरेशी, व पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये पुरुषघटांमध्ये पहिले बक्षीस 5001/माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, यांच्या वतीने प्रथम बक्षीस आलेल्या राहुल मदन पवार यांना देण्यात आले द्वितीय बक्षीस 3100/लोणार अर्बन बँक चे अध्यक्ष शांतीलाल गुगलीया यांच्या वतीने ज्ञानेश्वर गजानन घोगरे यांना देण्यात आले यांना देण्यात आले, तृतीय बक्षीस 2100/रुपये माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे यांच्या वतीने अर्जुन रामदास साळवे यांना देण्यात आले चतुर्थ बक्षीस माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब यांच्या वतीने संतोष मोरे यांना देण्यात आले पाचवे बक्षीस युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या हस्ते दत्ता महाजन यांना देण्यात आले व महिला गटामध्ये प्रथम बक्षीस 1100/रुपये माजिद कुरेशी यांच्या वतीने परिवर्तन अकॅडमी लोणारची विद्यार्थिनी किरण गजानन वाणी यांना देण्यात आले द्वितीय बक्षीस माजी नगरसेवक सतीश राठोड यांच्या वतीने कुमारी जयश्री गुलाब मोरे यांना देण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मण घुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सांगितले की जिंकलेल्या सर्व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या व हरलेल्यांना पुनश्च एकदा पुढच्या वेळेस मेहनत घेऊन सहभागी होऊन विजय होण्याच्या शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाची भूमिका आज रोजी देशात असलेली परिस्थिती यावर प्रकाश टाकला आज या स्पर्धेमध्ये मी धावतो ओठ चोरी रोखण्यासाठी सहभागी झाला आमचे नेते राहुलजी गांधी आज पूर्ण देशभर निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट कारभारा विरुद्ध आवाज उठवत आहे येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग अशा आंदोलनामध्ये असू द्या अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रम प्रसंगी लोणार नगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन शिंदे, माजी नगरसेवक संतोष मापारी, माजी नगरसेवक शेख रऊफ भाई माजी नगरसेवक प्रा. सुदाम कांबळे, शुभम चाटे, माजी नगरसेवक अरुण जावळे, शहर उपाध्यक्ष गजानन मापारी, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, एजाज खान, किसान सेलचे तालुकाध्यक्ष संजय राठोड, मेकर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष भरत राठोड, शहर सरचिटणीस शेख अजमत शेख अनामत, किसान सेलचे शहराध्यक्ष मदन परसु वाले, युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, मीडिया सेलचे शहर अध्यक्ष मोहसीन शहा, उपस्थित होते यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास मोरे यांनी सर्व स्पर्धेकांची जावं नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन खरात यांनी केले तर आभार शेख समद यांनी मानले.

लोकमंत्र न्यूज

Post a Comment

0 Comments