Type Here to Get Search Results !

नागवंशी संघपाल पनाड यांना राज्यस्तरीय "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार"


लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील ज्येष्ठ समाजसेवक नागवंशी संघपाल पनाड यांना यंदाचा राज्यस्तरीय "महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार" जाहीर झाला असून, या मानाच्या सन्मानामुळे संपूर्ण सुलतानपूर गावात आनंदाची लहर उसळली आहे.हा पुरस्कार आंबेडकरी चळवळ मेहकर व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.

नागवंशी संघपाल पनाड यांनी गेली अनेक दशके समाजकार्याच्या क्षेत्रात अविरतपणे कार्य केले आहे. गोरगरीब, पीडित, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या अडचणी ओळखून त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, सामाजिक एकतेचा प्रचार-प्रसार करणे, आणि प्रत्येक दु:खी माणसाच्या वेदना समजून त्याला मदत करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे.गावागावांत पोहोचून संकटग्रस्त कुटुंबांना आधार देणे, गोरगरिबांच्या हक्कांसाठी लढा देणे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी खऱ्या अर्थाने समाजसेवेचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची यापूर्वीही तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पातळीवर अनेकदा दखल घेण्यात आली असून, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार" हा त्यांच्या कार्याला लाभलेला सर्वोच्च सन्मान मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments