बुलडाणा, लोकतंत्र न्यूज
बुलढाणा तालुक्यातील धाड येथील करडी फाट्यावर असलेल्या भोंडे पेट्रोल पंपावरून चोरीस गेलेली १ लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम अवघ्या काही दिवसांत हस्तगत करत स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे. याप्रकरणी मौंढाळा येथील १९ वर्षीय तरुणाला शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस अंमलदार शरद गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम अघाव आणि युवराज राठोड यांच्या पथकाने केल्याची माहिती २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता प्राप्त झाली आहे.

Post a Comment
0 Comments