मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख परिसरात २७ जून रोजी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदीला पूर आल्याने नदीकाठावरील बंधारे तुडुंब भरून वाहून गेले आहे.
गेल्या चार दिवसांपासून पाऊस परिसरात दररोज हजेरी लावत असल्याने परिसरातील सोयाबीन पेरणीला सुरुवात झाली आहे.२७ जून रोजी रात्रीच्या दरम्यान मुसळधार पावसाने नदीला मोठ्या प्रमाणात पुर आल्याने नदीकाठच्या शेजारी शेतात पाणी गेल्याने शेतातील माती वाहून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Post a Comment
0 Comments