Type Here to Get Search Results !

शेलगाव देशमुख येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन

 


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील ग्रामपंचायत कार्यालयात 31 मार्च रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पूजाताई म्हस्के होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच तथा प्रशासक किरणताई दिलीप आखरे, उपसरपंच विनोद गोरे, युवासेना उपप्रमुख एकनाथ खराट,ग्रामपंचायत अधिकारी दिपक काळे,माजी उपसरपंच विलास कड्डक सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजाताई म्हस्के व प्रमुख पाहुणे सरपंच तथा प्रशासक किरणताई आखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच विनोद गोरे यांनी केले. यावेळी सरपंच पती दिलीप आखरे,माधव कड्डक, दत्ता गोरे, भुजंगा सुर्वे, जयश्रीताई गोरे, गंगाताई गोरे, गजानन खोडवे, सह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments