मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे 31 मार्च रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच पदी दिलीप आखरे, उपसरपंच विनोद गोरे, युवासेना उपप्रमुख एकनाथ खराट,ग्रामपंचायत अधिकारी दिपक काळे,माजी उपसरपंच विलास कड्डक सह उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष राजेश ताकतोडे,विनोद खंदारे, शासकीय ठेकेदार भुषण उगले,दत्ता गोरे, पुरुषोत्तम आखरे, राजेश पोफळे,सागर आखरे,अजय गरड,कृष्णा आखरे,दिपक डोळस, योगेश मिस्कीन सह शिवभक्त, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments