बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यासाठी जिल्हा श्रीमंत देशमुख यांच्या नेतृत्वात दि.३ आक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार ८ हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे या व ईतर विविध मागण्यासाठी ग्राम रोजगार सहायक संघटना व सर्व सामान्य ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वतीने दि. १ एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे व दि.४ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद कार्यालय पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
सदर आंदोलनाची दखल घेऊन ग्राम रोजगार सहाय्यकांच्या पुढील मागण्या मंजूर करण्यात याव्या.१) दि ३ आक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे ८ हजार रुपये मासिक मानधन व २ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.२) अर्धवेळ चा शासन निर्णय रद्द करुन पुर्णवेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा.३ ) मजूरा प्रमाणे ग्राम रोजगार सहाय्यक यांना मानधन वैयक्तिक बँक खात्यात जमा करावे.४) ऑनलाइन कामे करण्यासाठी संगणक (लॅपटॉप) व नेटवर्क साठी डेटा पॅक देण्यात यावा.वरील मागण्या मंजूर कराव्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.यावेळी जिल्हा सचिव पृथ्वीराज गवई, नेपालसिंग राजपूत,ज्ञानेश्वर गावंडे, जिल्हा संघटक संजय मोरे, कार्याध्यक्ष गजानन निळे, मार्गदर्शन मदन खरात, दिनकर मोरे,दिपक गवई,संदिप मापारी, भगवान अवसरमोल, प्रविण ठोकळ, परमानंद अवसरमोल, सुरेश राठोड, श्रीकृष्ण तांगडे,शेख सैयद,शेख झाकिर सह ग्रामरोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments