Type Here to Get Search Results !

मदन वामन पातुरकर विद्यालयात प्राचार्य रमेश जाधव यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

 शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य रमेश सुदामा जाधव हे ३२ मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापूर्ती गौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्रेमराज भाला हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक सहदेव सुरडकर, डॉ भूषण डागा, गोपाल बोरा, सुनील लाहोटी, माजी प्राचार्य अरविंदराव आसोलकर, दिगंबर मुरकुट, त्र्यंबक मोरे ,राजेंद्र उमाळे ,अनिल कुलकर्णी , अरुण मुगल ,मीना खेर्डीकर, गट समन्वयक प्रमोद रायमूलकर, स्थानिक सल्लागार राजकुमार सारडा, सुनील बियाणी, बबनराव गोरे, नागेश राजबिंडे. डॉ शालिग्राम अवचार,गजानन चव्हाण, डॉ किरण चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.

 


प्राचार्य रमेश जाधव यांच्या सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त संस्था सचिव प्रेमराज भाला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य रमेश जाधव व त्यांच्या अर्धांगिनी वनिता जाधव यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून प्राचार्य रमेश जाधव यांच्या शैक्षणिक कार्य विषयीची यथोचित प्रशंशा करून संस्थे करता असणाऱ्या योगदानाबाबत आपल्या भाषणातून गौरवोद्गार काढले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्राचार्य रमेश जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विविध विद्यालयाचे प्राचार्य सतीश गवले, सुभाष मोरे ,आरसोडे, गणेश नालींदे, बारापात्रे, रामेश्वर कुटे श्रीपाद दंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा कुलकर्णी यांनी केले.आभार प्रदर्शन प्रिया कुटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments