मलकापूर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथे नारीशक्तीचा अभिमान या अधिपत्याखाली नवचंडी मातेच्या मिरवणुक काढण्यात आली.
श्री संत गजानन महाराज मंदिर येथे गुढीपाडवा ते रामनवमी ह्या दरम्यान देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुसंघाने आज संध्याकाळी लेझीम पथक मलकापूर येथील बजरंग दलाच्या मुली आणि नऊ देवी रूप धारण करणाऱ्या मुली सहभागी झाल्या होत्या यामध्ये बजरंग दलाच्या मुलींनी काठी फिरविणे, तलवार चालविणे इत्यादी प्रात्यक्षिक करून दाखविले या अगोदर सर्व नऊ देवी रूप धारण करणाऱ्या मुलींना मंदिरामध्ये स्नेहभोजन दिले होते या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुधाकर तायडे यांनी दिली आहे.


Post a Comment
0 Comments