लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सुलतानपूर (ता. लोणार) येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक गीतांचा भव्य कार्यक्रम व नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री शिवाजी हायस्कूल, सुलतानपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात बुद्ध, शिव, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रबोधनात्मक गीतांचे सादरीकरण करण्यात आले. टीव्ही फेम गायिका सपनाताई खरात यांच्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘नारीशक्ती सन्मान’ करून गौरव करण्यात आला. सन्मानित महिलांना सन्मानपत्रासह भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित उपसरपंच नागवंशी संघपाल पनाड होते. कार्यक्रमाचे आयोजक अनित्य घेवंदे, अख्तर भाई, अतीष पनाड, प्रदिप मोरे, शुध्दोदन सरदार, राजू भानापुरे होते. कार्यक्रमास नागवंशी सामाजिक संघटन, भीम योद्धा ग्रुप, स्टार ग्रुप, माता रमाई महिला मंडळ व सुरसंगम डेकोरेशन, सुलतानपूर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला प्रा. के. बी. इंगळे, किरणताई लाहोटी, अमोल अवसरमोल (सरपंच, अंजनी खुर्द), गौतम अवसरमोल, उषाताई नरवाडे (संबोधी ग्रुप, लोणार), आमिर भाई, जमीर साहेब, पत्रकार सागर पनाड, उध्दव फंगाळ, सद्दाम भाई, असिम भाई, राजीक शेख, गणेश भानापुरे, प्रेम झोरे, रवी झोरे, पत्रकार चांद भाई, सुरेश मोरे, वसीम भाई, मोईन खान, मुकद्दर भाई, दादाराव पनाड, बिंबीसार पनाड, सागर आत्माराम पनाड, ब्रह्मा सरदार, सुधाकर पनाड, संजय शेजूळ, प्रसंजित पनाड, जीवन सभादिंडे, मंगेश पनाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात समाजसेविका विदर्भ कन्या शाहीन पटेल; शैक्षणिक क्षेत्र: ममता प्रेमकुमार झोरे, कल्पना अण्णा बांगरे; गटप्रवर्तक: गंगा अंभोरे; आरोग्य सेविका: वैशाली सरदार; आशा सेविका: आशालता पनाड, शारदा मुळे, मीना मोरे, भारती भराड, राधा रिंढे, शीला रिंढे, आशा पनाड, मालता हिवाळे; अंगणवाडी सेविका: वैशाली पनाड, पुष्पा मोरे, रुखमीना पनाड, सत्यशीला टकले, रेणुका दळवी, सुरेखा अंभोरे, अंजली परिहार, रेखा जाधव, दुर्गा भानापुरे, अनिता जावळे, सविता पनाड; अंगणवाडी मदतनीस: उषा आवारे, निर्मला अवचार, सरिता पनाड, मनीषा नारिंगे, पूजा रिंढे, हिना परवीन अयाज पठाण, अफिफा बी शेख मजीद, कोकिळा सुरसे, प्रमिता जावळे, हलीमा शेख खलील, तबस्सूम शेख रफिक यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांचा जागर करण्यात आला असून महिलांच्या कार्याचा सन्मान करून समाजात समानता, स्वाभिमान व संविधानाच्या मूल्यांचा संदेश देण्यात आला.

Post a Comment
0 Comments