Type Here to Get Search Results !

मदन वामन पातुरकर विद्यालयात सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न


डोणगाव, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक अरुण नामदेव मुगल यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन 27वर्ष सेवा देऊन शिक्षण क्षेत्रात ठसा उतरवला असून नियत वयोमानानुसार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा संस्थेच्या वतीने अरुण नामदेव मुगल यांचा सेवा गौरव सत्कार समारंभाचे आयोजन 31 जानेवारी रोजी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलें होते यावेळी सत्कार मूर्ती म्हणून सेवानिवृत्त शिक्षक अरुण मुगल व त्यांच्या अर्धांगिनी कल्पनाताई मुगल उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालक संचालक गोपाल बोरा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सल्लागार सुनील बियाणी. बबन गोरे नागेश राजबिंडे. डॉ अवचार. गायकवाड. चव्हाण.काळे. मोरे राजकुमार सारडा. यांच्यासह माजी प्राचार्य मुरकुट. माजी प्रचार्य उमाळे. माजी प्राचार्य मोरे. विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव. मुकुंद पिंपरकर खिर्डीकर मॅडम मान्यवर उपस्थित होते यावेळी अरुण मोगल यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे अरुण मोगल यांचा सेवापुर्ती कार्यकाल संपल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे दिसले यावेळी सेवापुर्ती गौरव सोहळ्याला पालक संचालक गोपाल बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अरुण मुगल यांचे शैक्षणिक कार्य खरोखर प्रेरणादायी असून येणाऱ्या काळात त्यांच्या हातून समाजसेवा होत राहो आशिष शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांनी सुद्धा अरुण मुगल यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सत्कारमूर्ती अरुण मुगल कल्पनाताई मुगल यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित शाल श्रीफळ भेटवस्तू व तुळशीचे पवित्र रोपटे भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला अरुण मुगल यांनी भावनिक होऊन आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गवले यांनी केले आभार प्रदर्शन कुलकर्णी मॅडम यांनी केली.

Post a Comment

0 Comments