मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर येथील क्रीडा संकुल येथे २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मेहकर पंचायत समितीच्या वतीने आयोजित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मेहकर-लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी डी. बी. खरात, डी. एम. जाधव, कृषी विस्तार अधिकारी संदिप मेटांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी एम एस वानखेडे, सावत्रा येथील माजी सरपंच गजानन निकस, दिलीप बळी, एडवोकेट संदिप गवई तसेच विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव व कर्मचारीवृंद आणि मेहकर पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments