डोणगाव, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालयात 77 वा प्रजासत्ताक दिन प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात पार पडला . सर्वप्रथम भारतमाता ,भारतीय संविधान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे संचालक अशोक कोटेचा व अरविंदराव शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.अतिथींचे व उपस्थित सर्व स्थानिक सल्लागार समिती सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
संचालक अशोक कोटेचा यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुनील बियाणी, भुजंगराव दांदडे,डॉ शालिग्राम अवचार, डॉ संजय कानकटाव , डॉ डिगांबर परमाळे, दत्तात्रय गायकवाड, श्री मोरे, नागेश राजबिंडे, माजी प्राचार्य त्रंबक मोरे ,माजी शिक्षक मुकुंद पिंपरकर या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यानंतर संपूर्ण गावामधून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीनंतर विद्यालयामध्ये बालसभेचे आयोजन करण्यात आले.
या बालसभा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प हनमंत महाराज काळे हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये राजकुमार सारडा, माजी प्राचार्य त्र्यंबक मोरे, सुवर्णा कुलकर्णी , पाटील मॅडम, संजय गवई ,दत्तात्रय उंडाळ , केशव सरकटे, ह. भ. प सोमनाथ महाराज सावळे प्रामुख्याने उपस्थित होते .
प्राचार्य रमेश जाधव यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो आणि एक आदर्श नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य काय आहे हे विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यानंतर वर्ग 5 ते 12 च्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली. अतिशय प्रभावीपणे विद्यार्थ्यांनी गीतांच्या माध्यमातून व आपल्या मनोगताच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले.
यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये ह. भ. प हनमंत महाराज काळे यांनी विद्यार्थ्यांना आपण एक जबाबदार नागरिक म्हणून काय केले पाहिजे, आपली भूमिका काय याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भंडारे यांनी केले. तर आभारप्रदर्शन अरुण मुगल यांनी केले. सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी , प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

Post a Comment
0 Comments