Type Here to Get Search Results !

आदर्श गाव पांगरखेडचे माजी सरपंच गणेश नालिंदे यांचा ठाकरे गट शिवसेनेत जाहीर प्रवेश


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पांगरखेड येथील माजी सरपंच गणेश नालिंदे यांनी मेहकर–लोणार मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात, उपजिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा शहर प्रमुख किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश प्रसंगी माजी सभापती भास्करराव गारोळे, विठ्ठलवाडीचे सरपंच धनराज राठोड, चंद्रभान शिंगणे, बळीराम राऊत, भागवत बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नामदेव काटेकर, धनसिंग राठोड, गजानन तोंडे, किशोर अप्पा नायगावकर, संतोष पोंधाडे, अशोक बघे, माजी सरपंच विनोद शिंगणे यांच्यासह शेकडोळ कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

गणेश नालिंदे यांनी आपल्या कार्यकाळात आदर्श गाव, समृद्ध गाव घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. गावाला पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्त्यांची कामे, स्वच्छता, नाल्यांची साफसफाई यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते, त्यामुळे जनमानसात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठे बळ मिळणार आहे.

यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी गणेश नालिंदे यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, ग्रामीण भागातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे जे कार्यकर्ते या चळवळीत काम करतील, त्या सर्वांना सोबत घेऊन खांद्याला खांदा लावून काम करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments