Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ गोपाल बच्छीरे

 


बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. गोपाल बच्छीरे यांची बिनविरोध तर निवडणुकीद्वारे सचिव म्हणून डॉ. शरद गावंडे यांची निवड झाली आहे. 

 राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेचे 45 वे दोन दिवशीय अधिवेशन खुलताबाद येथील चिस्तीया महाविद्यालय येथे घेण्यात आले मागील कार्यकारिणीचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याकारणाने या अधिवेशनातच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत पूर्वीच्या कार्यकारणीतील उपाध्यक्ष डॉ.गोपाल बच्छीरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली तर सचिव या पदासाठी डॉ. शरद गावंडे व डॉ. संजय पाईकराव, उपाध्यक्ष पदासाठी डॉ. सुभाष बेंजिरवार व डॉ. गजानन पाटील यांच्यात लढत झाली आणि सचिव म्हणून डॉ. शरद गावंडे व उपाध्यक्ष या पदावर डॉ. गजानन पाटील हे निवडून आले. त्याचबरोबर आठ जिल्हा प्रतिनिधी व दोन महिला प्रतिनिधी यांचीही निवड करण्यात आली या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. सोमनाथ रोडे व श्री एच.के. बागुल यांनी पारदर्शक निवडणूक घेऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला याप्रसंगी डॉ. बा.आं. मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. व्यंकटेश लांब, प्राचार्य गणी पटेल, डॉ. ग. का. माने, डॉ.ळ हरिभाऊ जमले, डॉ. प्रभाकर मिरकड, डॉ. विजय पांडे, प्राचार्य नारायण सूर्यवंशी माजी अध्यक्ष, डॉ. नितीन बावळे माजी सचिव, राम मुटकुळे, राजेंद्र धाये, डॉ केशव लहाने यांच्यासह अनेक मान्यवर व इतिहास संशोधक उपस्थित होते.प्राचार्य डॉ. गोपाल बच्छीरे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments