Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या समस्यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन उभे करणार - शेतकरी नेते रविकांत तुपकर


बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

बुलढाणा येथे २९ नोव्हेंबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जबरदस्त उत्साहात, संघर्षाची जिद्द मनात घेऊन पार पडली. जिल्हाभरातून हजारो क्रांतिकारी मावळे उपस्थित राहिल्याने सभेला प्रचंड ऊर्जा मिळाली आणि शेतकरी चळवळीची ताकद पुन्हा एकदा दिसून आली.


या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन–कापसाचा भावफरक, संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांचा वाढता उपद्रव, शेतीसाठी मजबूत कंपाऊंड, शेतमजुरांसाठी महामंडळाची गरज, पिककर्जातील अडचणी असे शेतकऱ्यांच्या जगण्याशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर थेट, तडाखेबंद चर्चा केली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांना न्याय मिळवण्यासाठी “जर आचारसंहितेतून वेळ मिळाला, तर भव्य आंदोलन उभे करायचे!” हा निर्णय एकमुखाने सभेत झाला.तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत ताकदीने उमेदवार उतरवण्याचा ठोस निर्धार सर्वांनी व्यक्त केला.संघर्षातच हक्क मिळतो, ही भावना प्रत्येक शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले सह अनेक मान्यवरांनी मनोगत मांडले.तसेच जिल्हाभरातून आलेल्या क्रांतिकारी मावळ्यांच्या सहभागामुळे बैठक फक्त यशस्वीच नाही, तर या लढ्याला नवी दिशा देणारी ठरली.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा संघर्ष आता आणखी निर्णायक होणार आहे हे मात्र नक्की आहे.

Post a Comment

0 Comments