लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या मुंबई कॉरिडोर थांब्यावर महिला सुरक्षित नसल्याचा प्रत्यय लोणार तालुक्यातील मांडवा गावा नजीकच्या कॉरिडोर वर आला आहे. बीबी येथून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवा गावाजवळच्या मुंबई कॅरिडोरच्या पेट्रोल पंपावर चहापाण्यासाठी थांबलेल्या एका महिलेची छेड काढण्याचा प्रकार तेथेच काम करणाऱ्या व्यक्तीकडून दिनांक 17 /10/ 2025 रोजी घडला आहे. नागपूर- पुणे - मुंबई समृद्धी महामार्गावरील स्वागत इंडियन पेट्रोल पंप खामगाव येथील अग्रवाल यांनी लिजवर चालविण्यासाठी घेतलेला आहे. तेथे आकाश गजानन इंगळे राहणार मांडवा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा हा कर्मचारी म्हणून सेवा देतो. दिनांक 17 /10/ 2025 रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास पुणे येथील नामांकित कंपनीत कर्तव्यास असणारी एक तरुणी खाजगी टॅक्सीने मध्यप्रदेशातील तिच्या गावाकडून आली होती. ती पुणे येथे जात असताना मांडवा जवळील कॉरिडोर वर चहापाण्यासाठी थांबली असता तेथील कर्मचारी आकाश इंगळे याने सदरील महिलेकडे पाहून विचित्र हावभाव केले व अश्लील इशारे केले .हा प्रकार त्या महिलेला सहन न झाल्याने तिने महिला हेल्पलाइन द्वारे पोलीस स्टेशनशी फोनवरून संपर्क साधला व घटनेची माहिती बीबी पोलीस स्टेशनला दिली. त्यावर बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व इतर कर्मचाऱ्यांनी तत्परतेने घटनास्थळाला भेट देऊन आरोपीस उचलून त्याचे विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 ,79, 351 ,(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास माननीय ठाणेदार संदीप पाटील यांचे मार्गदर्शनात बीट जमादार अरुण मोहिते हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments