बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा शहरातील क्रांतिकारी जनसंपर्क कार्यालय येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या पदावर निवड झाल्याबद्दल वैभव भुतेकर यांचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्कार केला.
वैभव भुलेकर यांच्या मेहनतीला, चिकाटीला आणि जिद्दीला सलाम. ही यशोगाथा अनेक तरुणांना प्रेरणा देणारी आहे.भविष्यातील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
आम्हाला अभिमान आहे की, आपल्या परिसरातील, आपल्या मातीतल्या सुपुत्राने राज्यात अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्यांच्या यशामुळे अनेक तरुणांच्या मनात आत्मविश्वास आणि प्रेरणेची नवी ज्योत निर्माण झाली आहे असे मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments