Type Here to Get Search Results !

मराठा कुणबी आरक्षण संदर्भातील शासन निर्णय रद्द करा- विष्णुपंत पाखरे

मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 


महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा - कुणबी आरक्षण संदर्भात हैदराबाद गझेटियर वर आधारित काढलेला शासन निर्णय हा ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याने तातडीने रद्द करावा यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाखरे यांच्या नेतृत्वात 27 आक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मेहकर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाखरे, सचिव पुरुषोत्तम लोखंडे, संतोष चोपडे ,राजेश पाखरे ,संतोष राऊत, अनिल वऱ्हाडे ,सुनील नालींदे ,नंदकिशोर पाखरे , ॲड .गोपाल पाखरे ,रामेश्वर तोडे, समाधान तोडे, सतीश गायकवाड, महादेव राजबिंडे, अशोक क्षीरसागर, गजानन मिसाळ, विजय देवडे, नंदकिशोर तोडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments