चिखली, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील आंचरवाडी आणि अमोना या गावामध्ये तब्बल (५) ट्रांसफार्मर बंद पडलेले होते शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू झाला असून शेती पिकांना पाणी देणे गरजेचे आहे यातच ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे शेतीचे कामे करणे शक्य होत नव्हते, म्हणून युवा शेतकरी नेते सुनील मिसाळ यांच्या पुढाकाराने तब्बल (५) ट्रांसफार्मर बसवण्यात आले आहे. शेतकरी गेल्या अनेक महिन्यापासून वीजपुरवठाच्या तीव्र समस्येला सामोरे जात होते रब्बी हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांना विजेची गरज या काळामध्ये फार आवश्यक आहे. परंतु डीपी जळाल्याने ते शक्य होत नव्हते. वकऱ्यांनी,शेतकऱ्यांनी वारंवार वीज वितरण कंपनीकडे तक्रार दाखल केली परंतु शेतकऱ्यांच्या या समस्येला विलंब होत असताना या भागातील शेतकरी नेते सुनील मिसाळ यांच्या कानावर या सर्व समस्या मांडल्या त्यांनी तात्काळ बुलडाणा येथील शेतकरी नेते, रविकांत तुपकर यांचे कार्यालय गाठून, युवा नेते अमोल मोरे यांना सविस्तर सांगून आपण प्रामुख्याने आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या समस्या त्यामध्ये प्रामुख्याने सर्व जळालेले ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसवून देण्याची विनंती केली.
अमोल मोरे यांनी महावितरण चे संबंधित इंजिनियर यांना अंचरवाडी आणि अमोना या दोन्ही ठिकाणचे बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर तातडीने लक्ष घालून नवीन ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बसवण्यात यावे, अन्यथा शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा आंदोलनाचा इशारा दिला..!
आंदोलनाचा इशारा देत वीज वितरण कंपनीचे इंजिनिअर यांनी तत्काळ आदेश देत शेळगाव आटोळ परिसरातील अंचरवाडी आणि अमोना या गावातील बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर लवकरात बदलून दिले. वेळेवर ट्रांसफार्मर दिल्याने शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा झाला पिकाचे रक्षण होणे सुलभ झाले युवा नेते सुनील मिसाळ यांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाल्याचे पहावयाला मिळाले. गावकऱ्यांनी क्रांतिकारी चे नेते अमोल मोरे आणि सुनील मिसाळ यांचे आभार मानले आणि म्हणाले की क्रांतिकारी शेतकरी संघटना आज प्रत्येक गावात आशेचा किरण बनली आहे विविध समस्येच्या बाबतीत तत्पर असून, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी लढणारी आक्रमक संघटना म्हणून पुढे येत आहे.
अंचरवाडी येथे नवीन ट्रांसफार्मर बसवितांना सुनील मिसाळ आणि अनेक शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते..

Post a Comment
0 Comments