Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक,जिल्हा परिषद गट व पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर



बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.

बुलढाणा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती एकूण 12 जागेपैकी सर्वसाधारण 6, महिला 6, अनुसूचित जमाती एकूण 3 जागेपैकी सर्वसाधारण 1, महिला 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 16 जागेपैकी सर्वसाधारण 8 महिला 8, सर्वसाधारण एकूण 30 जागेपैकी सर्वसाधारण 15, महिला 15 अश्या एकूण 61 जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली.

बुलढाणा जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यामधील सभापती आरक्षण याप्रमाणे : बुलढाणा तालुका- अनुसूचित जाती, नांदुरा- अनुसुचित जाती(महिला), मोताळा-अनुसुचित जाती, चिखली अनुसुचित जमाती(महिला), खामगांव- नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), मेहकर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, शेगांव- नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), देऊळगाव राजा-सर्वसाधारण (महिला), लोणार-सर्वसाधारण (महिला), सिंदखेड राजा- सर्वसाधारण, मलकापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळगांव जामोद-सर्वसाधारण(महिला), संग्रामपूर- सर्वसाधारण.

Post a Comment

0 Comments