मलकापूर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मलकापूर तालुक्यातील गिरणी येथील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे दिनांक 18 सप्टेंबर रोजी ह.भ.प गजानन महाराज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला.संत गजानन महाराज यांच्या मूर्तीचे पुजन करुन सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वासुदेव महाराज शास्त्री, दिलीप महाराज ,अनंता महाराज, प्रल्हाद महाराज ,विठ्ठल ठाकरे महाराज ,योगेश महाराज, नांदुरा तालुका अध्यक्ष सुरेश महाराज, मोताळा तालुका अध्यक्ष विनायक महाराज, गजानन महाराज ,मधुकर तायडे ,दिनेश गायकवाड यांच्यासह अनेक भाविक भक्त व वारकरी उपस्थित होते. यावेळी वासुदेव महाराज, दिलीप महाराज गायकवाड महाराज यांनी वारकरी यांच्या समस्या व शासनाकडून मिळणारे अनुदान इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये महिला भजनी मंडळ सक्षमीकरण वर सुद्धा प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर सर्वत्र वारकरी मंडळींना निशुल्क प्रमाणपत्र प्रमुख महाराजांच्या हस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलकापूर तालुका अध्यक्ष निनाजी महाराज खोडके यांनी तर आभार प्रदर्शन श्री संत गजानन महाराज मंदिर गिरणी अध्यक्ष चंदू पाटील यांनी केले कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसाद वितरण करण्यात आला. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुधाकर तायडे यांनी दिली आहे.

Post a Comment
0 Comments